RBI Saving Bank Account Rules आजच्या काळात बँक खाते त्यातही बचत खाते आवश्यक आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बँक अकाउंट अनिवार्य असून तुमचे बँक खाते नसेल तर डिजिटल व्यवहारी होऊ शकणार नाही. भारतात एकाधिक बँक खाती सुरू करण्यावर कोणतेही बंधन नाही म्हणूनच एका व्यक्तीकडे आज दोन किंवा त्याहूनही अधिक बँक अकाउंट आहे.
अधिक माहितीसठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
बचत खात्यात तुमच्या कष्टाची कमाई सुरक्षित राहतेच पण बँक वेळोवेळी त्यावर व्याजही देते. शून्य शिल्लक खाती वगळता सर्व खात्यांमध्ये किमान शिल्लक राखणे आवश्यक असते नाहीतर बँक तुमच्याकडून दंड वसूल करेल पण, बचत खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येईल याबद्दल काहीही बोलले जात नाही.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या महिलांना पुढच्या महिन्यापासून मिळणार नाही १५०० रुपये
यादीत नाव बघा
बचत खात्यात पैसे ठेवण्याची मर्यादा?
नियमांनुसार सेव्हिंग अकाउंटमध्ये कितीही म्हणजे हवे तेवढे पैसे ठेवण्याची परवानगी असून याबाबत कोणतीही मर्यादा निश्चित नाही. पण तुमच्या अकाउंटमध्ये जमा रक्कम अधिक आणि आयकर कक्षेत येत असेल तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा स्रोत आयकर विभागाला सांगावा लागेल. त्याचप्रमाणे, बँकेच्या शाखेतून पैसे जमा आणि काढण्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे पण, चेक (धनादेश) किंवा ऑनलाईन तुमच्या बचत खात्यातून एक रुपयापासून हजार, लाख आणि कोटी रुपयेही जमा करू शकतात.
कर्जमाफी योजनेच्या याद्या जाहीर या शेतकऱ्यांचे 3 लाख पर्यंतचे सरसगट कर्जमाफ
यादीत नाव बघा
बचत खात्यात कॅश जमा करण्याचे नियम
आयकर नियमानुसार बँक खात्यात ५० हजार किंवा त्याहून अधिक कॅश जमा केल्यास पॅन कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. तसेच एका दिवसांत एक लाखांपर्यंत कॅश बँक खात्यात जमा करता येऊ शकतात तर, खात्यात नियमित रोख जमा करत नसल्यास मर्यादा २.५० लाखापर्यंत असू शकते. याशिवाय एखादी व्यक्ती आर्थिक वर्षात खात्यात जास्तीत जास्त दहा लाख रुपये जमा करू शकते आणि ही मर्यादा एक किंवा अधिक खात्यांसाठी एकत्रितपणे करदात्यांना लागू होते.
पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या
लाभार्थी यादी जाहीर
बचत खात्यांवर आयकर विभागाची नजर
एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम रोखीने जमा केल्यास आयकर विभागाकडे स्रोताची माहिती उघड करणे अनिवार्य आहे. तसेच खातेदाराक आपल्या उत्पन्नाचा स्रोत योग्य पणे सांगू शकला नाही तर ठेव रकमेवर ६०% कर, २५% अधिभार आणि ४% उपकर आकारला जाऊ शकतो.
rbi saving bank account rules
लक्षात घ्या की दहा लाखांपेक्षा जास्त रोखीने व्यवहार होऊ शकत नाही असं नाही. तुमच्याकडे उत्पन्नाचा योग्य पुरावा असेल तर तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही आणि सहज रोखीने व्यवहार करू शकता. परंतु बचत खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे ठेवण्याऐवजी मुदत ठेव किंवा इतरत्र गुंतवणे फायद्याचे ठरू शकते जिथून चांगला परतावा मिळू शकतो.