या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर

अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध

या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टरपर्यंत आर्थिक सहाय्य मर्यादित आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार असून, विशेषतः सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल व तीळ या पिकांकरिता १००% अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

याशिवाय, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, वरई या पिकांकरिताही अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी ७/१२ उताऱ्यासह कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला दाखवून अनुदान वजा जाता लोकवाटा भरून प्रमाणित बियाणाचा लाभ घ्यावा.