Subsidy on Kharif Crop Seeds : नमस्कार मित्रांनो, अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान-अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी, बियाणे बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे महत्त्व लक्षात घेता, सुधारित/संकरीत वाणांच्या प्रसारासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर
अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
शेतकऱ्यांसाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध
या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टरपर्यंत आर्थिक सहाय्य मर्यादित आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार असून, विशेषतः सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल व तीळ या पिकांकरिता १००% अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
याशिवाय, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, वरई या पिकांकरिताही अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी ७/१२ उताऱ्यासह कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला दाखवून अनुदान वजा जाता लोकवाटा भरून प्रमाणित बियाणाचा लाभ घ्यावा.
या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर
अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाचे नियम
या घटकासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी (MahadBT) या संकेतस्थळावर बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते या ‘टाईल’ अंतर्गत अर्ज करता येतील.
महत्त्वाची सूचना: या घटकाची प्रथम लाभार्थी निवड यादी ३० मे २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल.
या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर
अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
प्रमाणित बियाणे घटकास अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी शेतकऱ्यांची Agristack वर नोंदणी असणे आवश्यक आहे. लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come, First Serve – FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे.
कृषी विभागामार्फत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.