rejection list Archives - Maze Sarkar https://mazesarkar.ladakibahin.com/tag/rejection-list/ Maze Sarkar Tue, 11 Feb 2025 09:28:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://mazesarkar.ladakibahin.com/wp-content/uploads/2024/12/cropped-Sheti-Batami-Favicon-3-1-32x32.jpg rejection list Archives - Maze Sarkar https://mazesarkar.ladakibahin.com/tag/rejection-list/ 32 32 लाडकी बहीण योजना अपात्र महिलांची यादी जाहीर यादीत नाव पहा https://mazesarkar.ladakibahin.com/aditi-tatkare-on-rejection-list/ https://mazesarkar.ladakibahin.com/aditi-tatkare-on-rejection-list/#respond Tue, 11 Feb 2025 09:28:23 +0000 https://mazesarkar.ladakibahin.com/?p=899 अपात्र महिलांची यादी जाहीर यादीत नाव पहा   Ladaki Bahin Yojana rejection list मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीची स्क्रूटिनी महिला व बाल विकास विभागाकडून केली जात आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या 5 लाखांनी घटली आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या 5 लाख लाडक्या बहिणींची नावं कमी झाली आहेत. ... Read more

The post लाडकी बहीण योजना अपात्र महिलांची यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on Maze Sarkar.

]]>
अपात्र महिलांची यादी जाहीर यादीत नाव पहा

 

Ladaki Bahin Yojana rejection list मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीची स्क्रूटिनी महिला व बाल विकास विभागाकडून केली जात आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या 5 लाखांनी घटली आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या 5 लाख लाडक्या बहिणींची नावं कमी झाली आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महिला सन्मान योजनेच्या महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून किती रक्कम मिळेलं यासंदर्भात योजनेच्या शासन निर्णयात स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

 

अपात्र महिलांची यादी जाहीर यादीत नाव पहा

 

पीएम किसान, नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांना किती पैसे?

28 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे एका महिन्यात 1500 रुपयांप्रमाणं एका वर्षात 18000 रुपये पाठवण्यात येणार आहेत. त्यापैकी 7 हप्त्यांचे 10500 लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. योजनेतील नियमाप्रमाणं पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 6000 रुपयांप्रमाणं पात्र शेतकरी महिलांना 12 हजार रुपयांची रक्कम मिळते. त्यामुळं थेट आर्थिक लाभाची रक्कम दरमहा 1 हजार रुपये होते. त्यामुळं महिला शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम दिली जाईल. म्हणजेच एखादी महिला शेतकरी आहे, तिला पीएम किसान सन्मान योजनेतून 6 हजार रुपये मिळतात. नमो शेतकरी महासन्मान मधून 6 हजार मिळतात, अशा वेळी संबंधित महिलेला दरमहा 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळतील.

 

अपात्र महिलांची यादी जाहीर यादीत नाव पहा

 

लाडकी बहीणच्या अर्जांची स्क्रूटिनी सुरु

महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला होता. जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून गेल्या दोन आठवड्यांपासून स्क्रूटिनी सुरु करण्यात आली आहे. या स्क्रूटिनीसाठी परिवहन विभाग, कृषी विभागाची मदत घेण्यात येत आहे. याशिवाय आयकर विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे.

अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ थांबवणार, पैसे परत घेतले जाणार नाहीत

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असं सांगितलं आहे. ज्या लाडक्या बहिणी निकषात बसणार नाहीत त्यांचा लाभ मात्र स्थगित केला जाईल.

The post लाडकी बहीण योजना अपात्र महिलांची यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on Maze Sarkar.

]]>
https://mazesarkar.ladakibahin.com/aditi-tatkare-on-rejection-list/feed/ 0 899