‘ओ मेरे सोना रे, सोना…’, या जुन्या बॉलीवूड गाण्यावर शिक्षकाचा विद्यार्थिनींबरोबर अफलातून डान्स; व्हिडिओ झाला व्हायरल

Teacher dance viral video : आजच्या शालेय शिक्षण पद्धतीत आणि पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत लक्षणीय बदल झाले आहेत. केवळ शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही मोठा फरक दिसून येतो. पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट समजावण्यासाठी मारणे किंवा शिक्षा देणे यांसारख्या पद्धतींचा वापर करत असत. याउलट, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात आणि त्यांना नवीन गोष्टी शिकवण्यासाठी विविध आणि आकर्षक मार्ग वापरतात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्याने केवळ अभ्यास करून चांगले गुण मिळवावेत यावरच अधिक भर दिला जात असे. मात्र, बदलत्या वेळेनुसार आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे छंद, कला आणि आवडीनिवडी यांसारख्या पैलूंकडेही लक्ष दिले जाते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल केले आहेत. अनेकदा शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांसोबत नाचताना किंवा गाणी गाताना दिसतात, जेणेकरून शिक्षण अधिक आनंदी आणि सहजसोपे होईल.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

आजकाल समाजमाध्यमांवर शाळा किंवा महाविद्यालयांतील शिक्षकांचे शिकवतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक शिक्षक दोन विद्यार्थिनींसोबत सुंदर नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, शाळेच्या बाहेरील परिसरात दोन विद्यार्थिनी एका शिक्षकासोबत ‘ओ मेरे सोना रे’ या लोकप्रिय जुन्या हिंदी गाण्यावर नृत्य करत आहेत. या वेळी शिक्षक आणि विद्यार्थिनी अत्यंत सुंदर आणि सहजपणे नाचत आहेत. त्यांचे चेहऱ्यावरील हावभावही खूप प्रभावी दिसत आहेत.

हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @hri_thik_hoon या खात्यावरून सामायिक करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच अनेक वापरकर्ते या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment