प्रत्येक रस्त्यावरील हे चित्र आता आपल्या अंगवळणी पडलंय;पण एखादा अपघात झाला असेल तर किमान थांबणे अपघातग्रस्ताला उपचार करणे एवढी तसदीही कोणी घेताना दिसत नसल्याचेही आपल्याला कानावर येते. आजच्या काळात माणूसकी पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात.सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल की लोकं असं कशी वागू शकतात.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रकचा भीषण असा अपघात झाला असून ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. यावेळी ट्रकलाही आग लागली असून त्या आगीत तो वेदनंन विव्हळतोय मात्र जमलेले लोक त्याला मदत करण्याएवजी त्याचा व्हिडीओ काढत आहे. हा जखमी ड्रायव्हर मदतीसाठी विनवण्याही करताना दिसत आहे मात्र कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही. अशा प्रकारे माणुसकीची हत्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. हा सगळा प्रकार पाहून माणसात आता माणुसकी शिल्लक राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित होतो.