उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा
1. ऑनलाइन अर्ज: PMUY च्या अधिकृत वेबसाइट (pmuy.gov.in) वर जा आणि ‘Apply For New Ujjwala 2.0 Connection’ वर क्लिक करा.
2. कागदपत्रे: आधार कार्ड, रेशन कार्ड (बीपीएल/अत्योदय), बँक पासबूक, आणि पासपोर्ट आकारातील फोटो अपलोड करा.
3. ई-केवायसी: नजीकच्या गॅस वितरकाकडे जाऊन ई-केवायसी पूर्ण करा. हे बायोमेट्रिक ओळखीद्वारे केले जाते.
4. वितरकाकडून संपर्क: तुमच्या परिसरातील गॅस वितरकाकडे अर्ज जमा करा. वितरक तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल.
5. कनेक्शन मिळणे: पडताळणी झाल्यावर 15-30 दिवसांत कनेक्शन आणि मोफत सिलिंडर मिळेल.
जर एकाच कुटुंबातील दुसरी महिला लाभ घ्यायची असेल, तर तिला स्वतंत्र अर्ज आणि कागदपत्रे सादर करावी लागतील. यामुळे प्रक्रिया थोड्या जटिल होऊ शकते, पण स्थानिक गॅस वितरकाची मदत घेऊन ही प्रक्रिया सोपी करता येते.