VIDEO: अशी वेळ कोणावरच येऊ नये! नवरदेवाला हळद लावायला गेला अन्…, एका क्षणात जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

VIDEO: अशी वेळ कोणावरच येऊ नये! नवरदेवाला हळद लावायला गेला अन्…, एका क्षणात जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

गेल्या अनेक वर्षांपासून आजारांचं प्रमाण जरा जास्तच वाढलंय. अगदी लहानग्यांपासून-मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गंभीर आजार होतात. यात कधी कुठे काय होईल याचादेखील नेम नसतो. ठणठणीत असलेल्या माणसालादेखील अचानक गंभीर आजार जडतो आणि यात लोकं आपला जीवही गमावतात. अशातच हृदयविकाराचा झटका येणंही आता अगदी सामान्य झालंय. घरात असताना, प्रवास करताना, गाडी चालवतानादेखील अचानक याचा त्रास होतो आणि माणूस जागच्या जागी आपले प्राण सोडतो.

सध्या अशीच एक घटना एके ठिकाणी घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जिथे हळदी समारंभात अचानक एका माणसाचा काळाने घात केला आणि त्याने त्याच जागी आपले प्राण सोडले. नेमकं काय घडलं जाणून घेऊ…

…अन् काळाने केला घात
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ठिकाणी अगदी उत्साहात हळदी समारंभ पार पडतो आहे. नवरदेवाला अनेक जण हळद लावताना दिसतायत. तितक्यात नवऱ्याला हळद लावण्यासाठी एक माणूस त्याच्याजवळ जातो. अगदी हसत खेळत त्याला हळद लावणार इतक्यात अचानक तो तिथल्या तिथेच कोसळतो आणि आपले प्राण सोडतो

Leave a Comment