Weather Update in Maharashtra : नमस्कार मित्रांनो, गेल्या २४ तासांत देशाच्या अनेक भागांमध्ये हवामानाने अचानक बदल दाखवले. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांनी थैमान घातले, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटे पावसाने हजेरी लावली.
या जिल्ह्यांमध्ये पडणार पुढील 48 तासात
जोरदार गारपीट
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही वादळी वारे आणि विजांचा धोका कायम आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी शनिवारी (२६ एप्रिल) पावसाचा इशारा देण्यात आला होता आणि आजही (२७ एप्रिल) काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे सावट आहे.
गेल्या २४ तासांमध्ये विदर्भातील काही भागांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला. शुक्रवारी, विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, ज्यामुळे या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
या जिल्ह्यांमध्ये पडणार पुढील 48 तासात
जोरदार गारपीट
आज आणि उद्या पावसाची शक्यता असलेले जिल्हे:
आज, २७ एप्रिल २०२५ (रविवार): रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उद्या, २८ एप्रिल २०२५ (सोमवार): नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यांमध्ये पडणार पुढील 48 तासात
जोरदार गारपीट
त्यामुळे, या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या आणि मेघगर्जनेच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा.